• A
  • A
  • A
विपरित परिस्थितीतही शिवसैनिक गद्दारी करत नाही - गुलाबराव पाटील

जळगाव - शिवसैनिक पक्षाच्या आदेशानुसारच काम करतो. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तो गद्दारी करत नाही. तो, जे करतो ते सरळ करतो. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता इतका भोळा आहे; तो कितीही शिव्या हासडेल, कितीही वाईट म्हणेल. पण कोणत्याही निवडणुकीत बटण दाबताना तो हिंदुत्वावरच दाबणार. त्याचा हात दुसऱ्या बटणावर जात नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शिवसेनेचे उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १५ फेब्रुवारीला जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या तयारीसंदर्भात जळगाव जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक शनिवारी जळगावात माजीमंत्री सुरेश जैन यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीसाठी माजी मंत्री सुरेश जैन, आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर. ओ. पाटील, चिमणराव पाटील, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ उपस्थित होते.
हेही वाचा - लंगोटही बांधू, अंगाला तेलही लावू आणि जिंकूही; गिरीश महाजनांचा सेनेला टोला
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शिवसैनिक हा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्यासाठी शिवसेनेची ताकद विरोधकांना दाखवण्याची संधी चालून आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेची पहिलीच म्हणजेच बोहनीची सभा जळगाव जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
उद्धव ठाकरे आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहेत - सुरेश जैन
या सरकारने ज्या पद्धतीने आपल्या नेत्यांना, आपल्याला चुकीची वागणूक दिली आहे. त्यामुळे आपली सरकारवर नाराजी आहे. आपले नेते उद्धव ठाकरे हे आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. हे सरकार जरी युतीचे सरकार असले तरी आपल्यापैकी एकाही कार्यकर्त्याला हे सरकार कधीच आपले वाटले नाही, असे मत सुरेश जैन यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या, जळगावातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
भाजपला गाडण्याची तयारी ठेवा - संजय सावंत
भाजपचे मंत्री शिवसेनेला संपवण्याची भाषा करत आहेत. मात्र, शिवसैनिकांनी धीर खचून जाऊ देऊ नये. भाजपला मातीत गाडण्याची तयारी ठेवा, असे आवाहन संजय सावंत यांनी केले. आमदार किशोर पाटील यांनीही बैठकीत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, युती झाली किंवा नाही झाली तरी जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेकडेच ठेवावी. या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, असे त्यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES