• A
  • A
  • A
डॉक्टरांचा हलगर्जीपणा, प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात राहिला कापसाचा बोळा

जळगाव - बाळंतपणासाठी आलेल्या महिलेची शस्त्रक्रिया केल्यानंतर कापसाचा बोळा तिच्या पोटातच राहिला. त्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. हा हलगर्जीपणाचा प्रकार जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात घडला आहे.


खासगी रुग्णालयात उपचार करुन महिलेच्या पोटातील कापसाचा बोळा काढण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन डॉक्टरांना जाब विचारला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या, जळगावातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हरिविठ्ठल नगरातील दुर्गा योगेश माळी (वय २३) या विवाहितेची प्रसूती जिल्हा रुग्णालयात ६ जानेवारी रोजी झाली. १८ जानेवारी रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दुर्गाची सोनोग्राफी केली असता धक्कादायक बाब समोर आली. तिच्या पोटात प्रसूतीच्या शस्त्रक्रियेनंतर कापसाचा बोळा राहिल्याचे निष्पन्न झाले. हा कापसाचा बोळा पुन्हा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला.
या प्रकारानंतर दुर्गा हिचे कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी पोहचले होते. अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या दालनात सकाळी १० वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत गोंधळ व तणाव सुरूच होता. दुर्गा हिची नॉर्मल प्रसूती झाली होती. कापसाचा बोळा गर्भाशयात नसून रक्तस्त्राव रोखण्यासाठी बाहेरच्या बाजुने लावला असल्याचे डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले. परंतु, दुर्गा यांच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन कापसाचा बोळा काढल्याचे त्यांना सांगितले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES