• A
  • A
  • A
धुळे लोकसभा : सुभाष भामरेंच्या विरोधात अनिल गोटे निवडणुकीच्या रिंगणात..!

धुळे - जस-जशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तस तसे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. शहराचे आमदार अनिल गोटे हे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर गोटे विरुद्ध डॉ. सुभाष भामरे सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने आमदार अनिल गोटे यांना दगा दिला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील वाद चव्हाट्यावर आले होते. डॉ सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद टोकाला गेला होता. आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र असे असलं तरी आमदार गोटे या निवडणुकीत कोणाला साथ देतात आणि कोणाचा प्रचार करतात याकडे धुळे लोकसभा मतदार संघाचं लक्ष लागले आहे.


गेल्या अनेक दिवसापासून आमदार गोटे हे देखील अज्ञातवासात गेल्यासारखे आहेत. गोटे हे लोकसभेसाठी कोणाला साथ देतात, की स्वतःच निवडणूक लढवतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या निवडणुकीत डॉ. भामरे यांचा पराभव करण्यासाठी आमदार गोटे यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. डॉ. भामरे यांचा पराभव करण्यासाठी आमदार गोटे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपच्या वादात गोटेंचा विजय होऊ शकतो. मनमाड इंदौर रेल्वेमार्गाच्या आंदोलनासाठी आमदार गोटे यांनी केलेले आंदोलन हे सर्वांना परिचित आहे. गोटेंच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यावर आता भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES