• A
  • A
  • A
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १६ फेब्रुवारीला धुळे दौरा, प्रशासनाकडून दौऱ्याची तयारी सुरू

धुळे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १६ फेब्रुवारीला धुळ्यात विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. तसेच या ठिकाणी मोदींची सभादेखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत दौऱ्याची घोषणा झालेली नाही.

संग्रहीत छायाचित्र


धुळे-मनमाड-इंदोर रेल्वे मार्गचे भूमिपूजन आणि सुलवाडे जामफल उपसा सिंचन योजना या २ विकास कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या होणार असून मोदींच्या दौऱ्याची प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातील मालेगाव रोड भागात मोदींची सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा - धुळ्यात निवडणूक लढवून दाखवा, गोटे यांचे महाजनांना आव्हान
एकीकडे या दौऱ्याची तयारी सुरू करण्यात आली असली, तरी दुसरीकडे मात्र या दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. यामुळे हा दौरा होणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसेच मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाच्या मंजुरीबाबत कोणतीही तरतूद झालेली नसताना भूमिपूजन कसे काय केले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे हा दौरा होतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - हेल्मेटसक्तीला फक्त राजकीय पक्षांचा विरोध


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES