• A
  • A
  • A
धुळ्यात निवडणूक लढवून दाखवा, गोटे यांचे महाजनांना आव्हान

धुळे - बारामतीत काय निवडणूक लढता धुळ्यात येऊन लढा. मतपत्रिकेतून तुमची लायकी दाखवून देईन, असे आव्हान आमदार अनिल गोटे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना एका पत्रकाद्वारे दिले आहे.

संग्रहित छायाचित्र


पक्षाने आदेश दिला तर बारामतीही जिंकू, असे वक्तव्य राज्याचे गिरीश महाजन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते. महाजन यांच्या या विधानावर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी शाब्दिक हल्ला चढविला आहे.
हेही वाचा - हेल्मेटसक्तीला फक्त राजकीय पक्षांचा विरोध
अनिल गोटे यांनी काढलेल्या या पत्रकात गिरीश महाजन यांचा समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी 'बारामतीत काय लढता, धुळ्यात येऊन लढा, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेने लढल्यास तुमची खरी लायकी दाखवून देईन', असे आव्हान आमदार गोटे यांनी गिरीश महाजन यांना दिले आहे.
आमदर गोटे यांच्या या पत्रकामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. गोटे यांच्या या आव्हानाला महाजन काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - धुळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने काढली हेल्मेटची अंत्ययात्रा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES