• A
  • A
  • A
हेल्मेटसक्तीला फक्त राजकीय पक्षांचा विरोध

धुळे - शहरात गेल्या ४ दिवसांपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र, या हेल्मेटसक्तीला फक्त राजकीय पक्षांकडून विरोध होताना दिसत असून सर्वसामान्य नागरिक मात्र हेल्मेट खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे.


धुळे शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे, या सप्ताह अंतर्गत वाहतुकीचे नियम न पाळणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. रास्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात हेल्मेटसक्ती केली आहे. ही हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी नागरिकांना माहिती देणे गरजेचे मात्र, अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दंड भरावा लागत आहे. या हेल्मेट सक्तीला राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होतांना दिसत आहे, राष्ट्रवादी, मनसे, आणि शिवसेनेने याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

हेही वाचा - धुळ्यात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने काढली हेल्मेटची अंत्ययात्रा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने हेल्मेटची अंत्ययात्रा काढून या निर्णयाचा निषेध केला. मात्र, एकीकडे या हेल्मेटसक्तीला राजकीय पक्षांकडून विरोध होताना दिसत असताना दुसरीकडे मात्र शहरात हेल्मेट खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

हेही वाचा - धुळ्यात हेल्मेटसक्ती विरोधात 'मनसे' आंदोलन
वाहतुकीचे नियम सांगणाऱ्या पोलीस प्रशासनाने शहरातील रस्त्यांची दुरावस्था, सिग्नल यंत्रणा, वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उभे नसणे, या प्रश्नांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. नागरिकांचा हेल्मेट खरेदीला मिळणारा प्रतिसाद आणि दुसरीकडे हेल्मेटला राजकीय पक्षांचा विरोध या परिस्थितीने नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES