• A
  • A
  • A
धुळ्यात हेल्मेटसक्ती विरोधात 'मनसे' आंदोलन

धुळे - शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. ही सक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे. या हेल्मेट सक्तीच्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात मनसेकडून आंदोलनही करण्यात आले.


धुळे शहरात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही पूर्वसूचना न देता अचानक शहरात हेल्मेटसक्ती लागू केली आहे. ज्या नागरिकांनी हेल्मेट घातलेले नाही अशांकडून ५०० रुपये दंड वसूल केला जात आहे.

हेही वाचा- धुळ्यात मोबाईल गेम खेळणाऱ्या दोन गटात 'राडा'
एकीकडे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करून हेल्मेटसक्ती राबविण्यात येत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला मनसे विद्यार्थी सेनेने विरोध करत पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तर हेल्मेटसक्ती तात्काळ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेने दिला आहे.

हेही वाचा- सांगलीत रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत अपघात, पोलिसांनी घेतली दखल





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES