• A
  • A
  • A
हेल्मेट न वापरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा

धुळे - रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेट न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र, ही कारवाई आता पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील करण्यात येत आहे. मंगळवारी तब्बल १५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.


धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या सप्ताहातंर्गत नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती करण्याबरोबरच नियमबाह्य वाहने चालविणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवक महोत्सव संपन्न
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेने विनाहेल्मेट वाहन चालविणे, चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे, कागदपत्रे नसणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत आता ही कारवाई पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात ही कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी तब्बल १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील धास्तावले आहेत. एकीकडे ही कारवाई सुरू करण्यात आली असली तरी पोलीस प्रशासनाने मात्र अवैध धंदे, सर्रासपणे सुरू असलेली गुटखा विक्री, यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - सावरकरांचे विचार देशाला संपन्न करणारे- करंबळेकर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES