• A
  • A
  • A
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवक महोत्सव संपन्न

धुळे - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विभागीय युवक महोत्सव धुळे तालुक्यातील कुसुम्बा येथे उत्साहात पार पडला. या महोत्सवात ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.


हेही वाचा - युवक महोत्सवात खूप शिकायला मिळाले, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीमती नर्मदाबाई चौधरी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय विभागीय युवारंग या युवक महोत्सवाचे आयोजन धुळ्यातील कुसुम्बा येथे करण्यात आले होते. या युवक महोत्सवात जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयातील ५८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालय परिसरात ६ रंगमंच उभारण्यात आले होते. या युवक महोत्सवात २३ कला प्रकारांच्या स्पर्धा पार पडल्या. यात काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद, रांगोळी, कोलाज, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, मेहेंदी, पाश्चिमात्य संगीत, सामूहिक गायन, यासोबत विविध स्पर्धा पार पडल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES