• A
  • A
  • A
सावरकरांना अपेक्षित राष्ट्र निर्माण होणे गरजेचे- करंबळेकर

धुळे - शहरात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सावरकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहचण्यास मदत होते, सावरकरांना अपेक्षित असणारे राष्ट्र निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी यावेळी केले.


धुळे शहरात भाषा प्रभू पु. भा. भावे साहित्य नगरीत अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात विविध व्यक्त्यांनी आणि सावरकर अभ्यासकांनी सावरकरांच्या विचारांवर आपली मते मांडली. या २ दिवसीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सावरकरांच्या विचारांवर मंथन करण्यात आले. या साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला.

हेही वाचा -'सावरकरांनी कायमच कर्माला महत्त्व दिले'
यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्यासह आयोजक उपस्थित होते. या साहित्य संमेलनातून सावरकरांचे विचार आज तरुणांपर्यंत पोहचले, सावरकरांना अपेक्षित असणारे राष्ट्र निर्माण होणे गरजेचे आहे, सावरकरांचे विचार हे त्या काळात मान्य झाले नाहीत. मात्र, आज त्या विचारांवर अभ्यास होत आहे. सावरकांवर अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

हेही वाचा -सावरकरांनी इतिहासातून भविष्याचा वेध घेतला - अशोक मोडक

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES