• A
  • A
  • A
'सावरकरांनी कायमच कर्माला महत्त्व दिले'

धुळे - वि. दा. सावरकरांनी नेहमीच आधुनिकतेचे समर्थन केले. कायम कर्माला महत्व दिले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 'सावरकर आणि अत्याधुनिकता' याविषयी परिसंवाद पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी हे मत व्यक्त केले.


धुळे शहरात भाषाप्रभू पु. भा. भावे साहित्य नगरीत २ दिवसीय सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 'स्वा. सावरकर आणि अत्याधुनिकता' या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाठक होते. तर या परिसंवादात अरविंद कुलकर्णी आणि डॉ. आदित्य धोपटकर यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा - गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
या प्रसंगी बोलतांना अरविंद कुलकर्णी म्हणाले की, सावरकरांनी नेहमीच कर्माला प्राधान्य दिले. तसेच सावरकर हे आधुनिकतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. सावरकरांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला होता. तर डॉ. आदित्य धोपटकर म्हणाले की, सावरकरांनी गायीचे महत्व समजून सांगितले. मात्र, त्यांनी गायीची हत्या करा असे कधीच सांगितले नाही. सावरकर हे एकाचवेळी परंपरावादी होते. तसेच ते आधुनिक देखील होते. सावरकरांची विज्ञानवादी विचारधारा जगासमोर येणे ही काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
हेही वाचा - अण्णांच्या जीवाशी खेळू नका; मोदींनी उपोषणाला शुभेच्छा देणं संतापजनक-उद्धव

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES