• A
  • A
  • A
सावरकरांनी इतिहासातून भविष्याचा वेध घेतला - अशोक मोडक

धुळे - सावरकरांनी इतिहासातून भविष्याचा वेध घेतला. त्यांनी वर्तमानाशी त्याचा संबंध कधीच जोडला नाही, असे वक्तव्य डॉ. अशोक मोडक यांनी केले. ते अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनामध्ये बोलत होते.


हेही वाचा-देशाला पुढे नेण्यासाठी सावरकरांच्या विचारांची गरज - दिलीप करंबळेकर
यावेळी बोलताना डॉ. अशोक मोडक म्हणाले, इतिहासाचा वर्तमानाशी संबंध जोडला जाऊ नये, इतिहासातून भविष्याचा वेध घेतला गेला पाहिजे. देशाला उज्ज्वल करायचे असेल तर इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. मात्र, आज चुकीचा इतिहास सांगितला जातो. तेव्हा खऱ्या इतिहासातून भविष्याचा वेध घेणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. आज सावरकरांना समजून घेणे गरजेचे आहे, असे मत डॉ. अशोक मोडक यांनी यावेळी व्यक्त केले.
शहरात भाषा प्रभू पु. भा. भावे साहित्य नगरीत अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक मोडक यांचे 'स्वा. सावरकरांचा इतिहासावरील दृष्टिकोन' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी मीरा धारशिवकर होत्या.

हेही वाचा-सावरकरांचे नाट्यसृष्टीला मोठे योगदान, त्यांच्या लिखाणाने मराठी साहित्य समृद्ध



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES