• A
  • A
  • A
देशाला पुढे नेण्यासाठी सावरकरांच्या विचारांची गरज - दिलीप करंबळेकर

धुळे - भारताला सशक्त आणि समृद्ध राष्ट्र बनविण्यात सावरकरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे, आज देशातली परिस्थिती पाहता या देशाला सावरकरांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी धुळ्यात केले.



हेही वाचा - सावरकरांचे नाट्यसृष्टीला मोठे योगदान, त्यांच्या लिखाणाने मराठी साहित्य समृद्ध

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर साहित्य संमेलनाच आयोजन करण्यात आले आहे. २ दिवसीय या साहित्य संमेलनाचे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या संमेलनाला खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, रवी बेलपाठक, महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याठिकाणी ज्येष्ठ विचारवंत अशोक मोडक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना दिलीप करंबळेकर म्हणाले, आजही सावरकरांचे विचार देशाला पुढे नेण्यात उपयोगाचे आहेत. सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद हा अत्यंत प्रखर होता. धुळे शहरात होणारे हे संमेलन इतिहासात मोलाची भर घालणारे आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा - धुळ्यात सावरकरांच्या विचारांचा जागर, विद्यार्थ्यांनी सामूहिक गायनातून केले अभिवादन



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES