• A
  • A
  • A
सावरकरांचे नाट्यसृष्टीला मोठे योगदान, त्यांच्या लिखाणाने मराठी साहित्य समृद्ध

धुळे - शहरात पु. बा भावे साहित्य नगरीत २ दिवसीय सावरकर साहित्य संमेलनाला शनिवारी सुरूवात झाली. या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सावरकर आणि नाट्यसृष्टी याविषयावर परिसंवाद पार पडला. सावरकरांनी देशाच्या बाबतीत तसेच धर्माबाबतीत विचार मांडले, मात्र यासोबत सावरकरांनी नाटके लिहून मराठी साहित्य अधिक समृद्ध केले, अस मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.


हेही वाचा - धुळ्यात सावरकरांच्या विचारांचा जागर, विद्यार्थ्यांनी सामूहिक गायनातून केले अभिवादन
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश एदलबादकर हे होते. या परिसंवादात दिगपाल लांजेकर आणि प्रतिभा विश्वास यांनी सहभाग घेतला होता. सावरकरांचे विचार काळाच्या पुढचे होते. मात्र, आजवर सावरकर उपेक्षित राहिले याला कारणीभूत प्रसारमाध्यमे आहेत. प्रसारमाध्यमांतून सावरकरांची प्रतिमा नेहमीच चुकीची दाखवली गेली आहे.


सावरकरांनी हिंदुराष्ट्र आणि देशाचा नेहमी विचार केला. मात्र, यासोबतच त्यांनी आपल्या प्रखर लेखणीतून आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले. सावरकर विचारवंत होते तसेच त्यांनी नाटके लिहून मराठी साहित्य समृद्ध केले, असे मत या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले.
हेही वाचा - धुळे शहरात महास्वच्छता अभियानाला नुसतीच सुरुवात, काम काहीच नाही



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES