• A
  • A
  • A
धुळे शहरात महास्वच्छता अभियानाला नुसतीच सुरुवात, काम काहीच नाही

धुळे - महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र, यावेळी कोणतीही स्वच्छता करण्यात न आल्याने याला अभियान कसे म्हणावे असा प्रश्न धुळेकर नागरिकांना पडला आहे.


या अभियानाचा शुभारंभ आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. मात्र, या शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर कोणतीही स्वच्छता करण्यात आली नाही. विशेष म्हणजे महापौर आणि अन्य लोकप्रतिनिधी नंतर ज्या मार्गावरून गेले त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे हे अभियान कितपत यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
वाचा-गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या, ११ दिवसात ७ जणांच्या हत्या
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्या, जेसीबी मशीन, आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. धुळे शहर धूळ आणि कचरा मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील अनावश्यक झाडे तोडण्यात येणार आहे. शिवजयंतीपूर्वी शहरातील कचरा साफ केला जाणार आहे.

वाचा- आंदोलनाचा आज चौथा दिवस; अण्णांचे वजन साडेतीन किलोने घटले

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES