• A
  • A
  • A
व्यापाऱ्यांच्या फायद्याचा अर्थसंकल्प, धुळ्यातील व्यावसायिकांची प्रतिक्रिया

धुळे - केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प व्यापाऱ्यांच्या फायद्याचा असून लहान व्यावसायिकांना देखील याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील व्यावसायिकांनी व्यक्त केली.हेही वाचा - BUDGET 2019 : ही तर नुसती झलक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात ५ लाखांपर्यंतच्या प्राप्तिकरात देण्यात आलेली सूट हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. व्यापाऱ्यांच्या फायद्याचा हा अर्थसंकल्प असून लहान व्यावसायिकांना देखील याचा फायदा होईल, असेही व्यावसायिकांनी म्हटले.

शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्याचा घेतलेला निर्णय हा चांगला आहे, मात्र याला मर्यादा असून यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. शिक्षण आणि रोजगारात अजून तरतूद करणे गरजेचे होते, मात्र ते झालेले नाही. या अर्थसंकल्पाचा येत्या निवडणुकीत काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - २ महिन्यांनंतर मोदींच्या विरोधात सुरू होणार सर्जिकल स्ट्राईक - राहुल गांधी
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES