• A
  • A
  • A
पवारांचे नातू रोहित पवार नगरचे संभाव्य उमेदवार अरुण जगताप यांच्या भेटीला

अहमदनगर - दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जि. प. सदस्य रोहित पवार यांनी आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा केली. आमदार अरुण जगताप यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस कडून चर्चेत आहे. सुजय विखे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण मधील त्यांच्या विरोधात कोण यावर राष्ट्रवादीने अजूनही बोलायला तयार नाही.


आज जाहीर झालेल्या पक्षाच्या दुसऱ्या यादी मध्येही नगर मधील उमेदवार घोषित झालेला नाही. मात्र. जगताप पिता-पुत्रांच्या कार्यालयात मोठी लगबग दिसत आहे. त्यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज दुपारी जगताप पिता-पुत्रांची भेट घेतली.

या प्रसंगी रोहित पवार यांनी सांगितले की, मी स्वतः सर्व नगर दक्षिण मध्ये अनेक दिवसांपासून जनतेत फिरत आहे. मागील ५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सेना-भाजप सरकारविरोधात जनतेत विशेषतः शेतकरी, सामान्य कष्टकरी व मध्यमवर्गीय जनतेत प्रचंड असंतोष आहे. आजही जिल्ह्यात चारा छावणी, पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे असे अनेक प्रश्नांबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. मी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना भेटून याची कल्पना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत येथील रेल्वे पुलाची झालेली दुर्घटना दुर्दैवी असून दोषींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर दक्षिण मतदारसंघात आघाडीचाच उमेदवार विजयी होईल यात शंका नसल्याचे रोहितदादा पवार यांनी ठामपणे सांगितले.

याप्रसंगी जि.प सदस्य गुलाबकाका तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब जगताप, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, ज्ञानेश्वर रासकर, कर्जत युवक जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, रमेश भांबरे, दत्ता खैरे, योगेश गलांडे, अशोक बाबर, संजय कोळगे, बजरंग भुतारे, विष्णू म्हस्के आदी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES