• A
  • A
  • A
अहमदनगरमध्ये स्वाईन फ्लूने गर्भवतीचा मृत्यू

अहमदनगर - राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. सीमा अमोल आहेर (वय २५), असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा - नागपुरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ; १ महिन्यात २६ रुग्ण...
सीमाच्या काही दिवसापूर्वी अचानक पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला राहाता येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तिला गोचिड ताप आणि शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. मात्र, ती आपल्या माहेरी आहेर चितळी या गावी गेली असता तिला अचानक खोकला सुरू झाला. यानंतर नातेवाईकांनी तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सीमाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आरक्षण सरसकट संपवा; डॉक्टरांसह काही विद्यार्थ्यांची मागणी
वैद्यकीय अहवालात सीमाला स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. सीमाला ५ वर्षाची आराध्या नावाची मुलगी असून त्या सध्या ७ महिन्याच्या गर्भवती होत्या. या आजाराने त्यांच्या बरोबर ७ महिन्याच्या गर्भात असलेल्या बालकालाही जीव गमवावा लागला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES