• A
  • A
  • A
बिरोबा मंदिरात चोरी; आरोपी मुद्देमालासह जेरबंद

अहमदनगर - चार दिवसांपुर्वी कासारे येथील बिरोबा मंदिरातील दागिने व रोकड चोरणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. चांदीच्या नागफणीच्या बनवलेल्या विटा व दानपेटीतील रोकड असा ३ लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.


मंदिराचे पुजारी रावसाहेब शिंदे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपी संतोष एकनाथ बर्डे (वय ४२, रा. अकलापूर, ता. संगमनेर), गणेश जयराम गांगुर्डे, (रा. हिवरेकोरडा, ता. पारनेर), सोनार- मनोज चंद्रकांत उमाप (वय ४३ रा. म्हस्के गल्ली, लोणीप्रवरा, ता. राहता) यांना पोलिसांनी मुद्देमालासह घटनास्थळी हजर केले होते. चोरांनी लोणीप्रवरा येथील सराफाच्या मदतीने नागफणी वितळवुन तिच्या ३ किलो ६५४ ग्रॅमच्या विटा तयार केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, सचिन खामगळ, रोहन खंडागळे, सहाय्यक फौजदार सोन्याबापु नानेकर, दत्तात्रय हिंगडे, विजय वेठेकर, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, नाईक रवींद्र कर्डिले, मोहन गाजरे, बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, चालक संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांनी साफळा रचून आरोपी संतोष बर्डे पकडले.
गुन्ह्याची कबुली व इतर २ आरोपींची नावे त्याने सांगीतली. ही कारवाई अहमदनगरचे पोलीस अधीक्षक ईशु सिंधु, अप्पर अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES