• A
  • A
  • A
शिर्डी साई संस्थानच्या व्यवस्थापन बैठकीला गैरहजर राहणाऱया शिवसेनेच्या ३ सदस्यांची सदस्यता स्थगित

अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकुन सतत गैरहजर राहणाऱ्या शिवसेनेच्या 3 सदस्यांची सदस्यता शासनाने स्थगित केली आहे. यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळात आता सतरा पैकी केवळ सहा सदस्य उरले आहेत.


शासनाच्या विधी व न्याय विभागाने गेल्या महिन्यात याबाबतचा अध्यादेश काढला आहे़ याबाबतचा आदेश संस्थानला आज प्राप्त झाला़ मनिषा शामसुंदर कायंदे, रविंद्र गजानन मिर्लेकर व अमोल गजानन किर्तीकर अशी या सदस्यांची नावे आहेत नुकताच उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी राजीनामा दिला आहे़. तत्पुर्वीच भोसले आणि सचिन तांबे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहत.
हेही वाचा - २ दिवसात माध्यमासमोर आपली भूमिका मांडणार - राधाकृष्ण विखे-पाटील
साई संस्थानचे उपाध्यक्ष पद नाकारल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरवातीपासुनच व्यवस्थापनाच्या बैठकांवर अघोषित बहिष्कारच टाकला होता. संस्थानकडुन प्रत्येक बैठकीनंतर शासनाला माहिती सादर केली जाते़. सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्यास सदस्यत्व रद्द करण्याची तरतुद अधिनियमात आहे़. याच नियमाचा आधार घेवुन अखेर या तीन्ही सदस्यांचे सदस्यत्व स्थगित करण्यात आले़.

हेही वाचा - हे वागणे विखेंना शोभणारे नाही; बाळासाहेब थोरातांची टीका
२८ जुलै २०१६ ला शासनाने सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली सतरा पैकी बारा सदस्यांची नियुक्ती केली होती़. मात्र, गेल्या वर्षाभरात तीघांनी तांत्रिक बाबीमुळे राजीनामा दिला. तीघे गैरहजर राहात असल्याने शासनाने त्यांची सदस्यता स्थगित केली आहे. यामुळे आता या व्यवस्थापनात अध्यक्ष व पाच सदस्यच उरले आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES