• A
  • A
  • A
२ दिवसात माध्यमासमोर आपली भूमिका मांडणार - राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (बुधवारी) अहमदनगर येथे अनौपचारिक बोलताना विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. त्याबरोबरच याबाबतची आपली भूमिका येत्या २ दिवसात माध्यमांसमोर स्पष्ट करू, असे सांगितले.


हेही वाचा-हे वागणे विखेंना शोभणारे नाही; बाळासाहेब थोरातांची टीका
काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे डॉ. सुजय विखे-पाटलांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्यानंतर सुजयचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुढील भूमिका काय असणार, याबद्दल राज्यात सर्वत्र उत्सुकता आहे. त्याबरोबरच काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते का? याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राधाकृष्ण विखे-पाटील हे पदाचा राजीनामा देतात की पक्षात राहतात, की भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. काल रात्रीपर्यंत राधाकृष्ण विखे हे दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. रात्री उशिरा ते लोणीमध्ये आले. त्यानंतर नगर मार्गे तुळजापूरकडे जाताना त्यांनी नगरमध्ये मोजक्या लोकांशी चर्चा केली. या चर्चेत विखे यांनी आपण आपली भूमिका येत्या २ दिवसात स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही माध्यमांमध्ये माझ्या राजीनाम्याच्या येणाऱ्या बातम्या या चुकीच्या आहेत. काहींना माझ्या राजीनाम्याची घाई झाली असल्याचा टोला त्यांनी राजकीय विरोधकांना लगावला. त्यामुळे आता विखे-पाटील येत्या २ दिवसात आपली कोणती पुढील दिशा ठरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा-सुजय विखें विरोधात राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप; आज घोषणा होण्याची शक्यताCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES