• A
  • A
  • A
सुजय विखें विरोधात राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप; आज घोषणा होण्याची शक्यता

अहमदनगर - विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे नगर दक्षिणची जागा चर्चेत आली आहे. डॉ. सुजय यांनी नुकतेच मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुजय यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अरुण जगताप यांना मैदानात उतरवत आहे. काल रात्री याबाबत अंतिम निर्णय झाला असून, मुंबईत आज (बुधवारी) याची घोषणा होणार आहे. आमदार जगताप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


आमदार जगताप हे विधान परिषदेत दुसऱ्यांदा आमदार आहेत. तसेच त्यांचे पुत्र संग्राम जगताप हे ही २०१४ मध्ये मोदी लाट असताना राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत. जगताप कुटुंब मूळ श्रीगोंदा तालुक्यातील आहे. जिल्ह्यातील वजनदार नेते आणि भाजप आमदार शिवाजी कर्डीले हे जगतापांचे व्याही आहेत, आमदार संग्राम जगताप यांचे कर्डीले सासरे आहेत. आमदार अरुण जगताप यांचा शहरात मोठा दबदबा आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षाकडून झाली. त्यानंतर मधल्या काही काळ ते शिवसेनेत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आमदार अरुण जगताप यांची उमेदवारी ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठा विचार करून केली आहे. जगताप यांचे सोयरे-धायरे सर्व राजकीय पक्षात आहेत, त्याचा मोठा फायदा जगतापांना होऊ शकतो. विशेष करून आमदार कर्डीले यांची मोठी राजकीय अडचण होणार आहे, कर्डीलेच्या भूमिकेकडे त्यामुळे लक्ष असणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ते असल्याने तसेच श्रीगोंद्यात राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार असल्याने तेथून मोठे मताधिक्य त्यांना अपेक्षित असेल. विखे यांचे पक्षांतर्गत कडवे विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण ताकत जगताप यांच्या मागे उभी राहील. त्याचा फायदा पाथर्डी-शेवगाव आणि श्रीगोंदा मतदार संघात जगतापांना होणार आहे. या मतदारसंघात शरद पवार वैयक्तिक लक्ष घालणार असल्याने जगतापांच्या उमेदवारीने सुजय विखे यांना जिंकण्यासाठी अटीतटीची लढत द्यावी लागणार आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES