• A
  • A
  • A
खासदार दिलीप गांधींचा पत्ता कट, सुजय विखे लोकसभेचे नवे उमेदवार

मुंबई - विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे यांना भाजपचे अहमदनगर लोकसभेचे तिकीट मिळणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय विखे यांना पक्ष प्रवेश देण्यात आला असून विखे पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.


हेही वाचा-सुजय विखे भाजपत; जाणून घ्या, पत्नी धनश्री यांची प्रतिक्रिया
खासदार दिलीप गांधी यांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला होता. तसेच यापूर्वी गांधी हे दोनदा लोकसभेवर निवडून गेले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात दिलीप गांधी जलवाहतूक विभागाचे राज्यमंत्रीही होते. नगर पंचायतीत नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गांधी यांना आता राजकीय विजनवास सहन करावा लागणार आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळताच गांधी समर्थकांनी भाजप कार्यकलयात मुख्यमंत्र्यांसमोर गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही

जिंकून येण्याची क्षमता पक्ष पाहत असतो. पक्षाकडे आलेल्या हवाल्यानुसार तिकीट ठरत असते. दरम्यान ३ वेळा खासदार राहिलेले गांधी यांचा जनसंपर्क सध्या कमी आहे. तसेच त्यांची आता जिंकून येण्याची क्षमता राहिली नसल्याचे भाजपच्या गोटात चर्चिले जात आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील यांच्या सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, साखर कारखाने, मेडिकल कॉलेज एवढा मोठ्या संस्थांचा पसारा असलेला आयता उमेदवार भाजपला मिळत असल्याने गांधी यांचे नाव पक्षात बरेच मागे पडले असल्याचे चर्चिले जात आहे.

खासदार दिलीप गांधी हे अहमदनगर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आहेत. तर भानुदास बेरड हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. सुजय विखे यांच्या उमेदवारीबद्दल बेरड यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, पक्षश्रेष्टी जी जबाबदारी देईल तसे आम्ही काम करू, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, कोणा एका व्यक्तीचे कार्यकर्ते नाही. बेरड यांची ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी असून गांधी यांना आता वेगळ्या वाटा शोधाव्या लागणार आहेत.

हेही वाचा-राधाकृष्ण विखे-पाटलांना शिवसेनेची ऑफरCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES