• A
  • A
  • A
सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखेंवर कारवाईची शक्यता

अहमदनगर - राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांच्यावर पक्ष कारवाई करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. सुजय भाजपात गेल्याने काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते जनतेसमोर काय भूमिका मांडणार? त्यातून पक्षाचे मोठे नुकसान होणार असेच चिन्ह असल्याने विखे यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठी कारवाई करण्याची शक्यता आहे.


या परस्थितीत विखे यांनाही भाजपचीच वाट धरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र, पुत्र डॉ. सुजय यांच्या हट्टासाठी संपूर्ण विखे परिवाराची राजकीय कारकीर्द पणाला लावायची की संघर्षाची परंपरा कायम ठेवत आपले अस्तित्व अधोरेखित करायचे, या द्वंदात आता प्रवरा-लोणीकर अडकलेले आहेत.
हेही वाचा- २३ मे'ला जनेतेची 'मन की बात’ समोर येईल; शिवसेनेची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
..तर विखे पदाचा राजीनामा देणार पण पक्ष सोडणार नाहीत

डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे यांना काहीतरी निर्णय घेणे क्रमप्राप्त असणार आहे. पक्ष कारवाई करण्याअगोदर ते विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊ शकतात. एकूणच निवडणूक प्रक्रियेपासून राज्य स्तरावर दूर राहून ते काँग्रेसमध्येच राहू शकतात किंवा थेट नाराजी व्यक्त करत पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या सद्स्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेशही करू शकतात. मात्र, २०१४ प्रमाणे मोदी लाट नसताना आणि राज्यात आघाडी सत्तेत आल्यास त्यांना मुख्यमंत्री किंवा किमान २ क्रमांकाचे खाते मिळू शकते. त्याच बरोबर पक्षांतर्गत मुख्य विरोधक बाळासाहेब थोरात यांना थोपवण्यासाठी विखे यांना सध्या तरी काँग्रेस पक्षात राहणे हिताचे असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा-पवारांच्या मनात 1991 ची सल अजूनही धगधगती.. पुन्हा एकदा गडाख-विखे सामन्याची शक्यता

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES