• A
  • A
  • A
सुजय विखे पाटलांचा भाजपप्रवेश निश्चित; उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

अहमदनगर - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपप्रवेश अखेर निश्चित झाला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ते भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. आज कार्यकर्ता बैठकीनंतर त्यांनी याबाबतची घोषणा केली.


अहमदनगरमध्ये आज दुपारी सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करून त्यांनी भापमध्ये जाण्याच्या निर्ण्यावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा - वेळप्रसंगी अपक्ष लढू पण भाजपचे तिकीट नको - डॉ. सुजय विखे
यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. 'भाजपमध्ये जाण्याचा निर्णय माझा आहे. मी माझे निर्णय घेतो आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे निर्णय घेतात. त्यामुळे याचा परिणाम होणार नाही. उद्या १२ वाजता यासंबंधी अंतिम निर्णय समजेल, अशी संदिग्ध माहितीही सुजय विखेंनी दिली.
हेही वाचा -नाराजी कार्यकर्त्यांची, नाराजी मुख्यमंत्र्यांची! नगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा सुजय विखेंना...


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES