• A
  • A
  • A
५०० मुलींना शिकवणाऱ्या संगमनेरच्या सुनंदा भागवतांचा नागरी सत्कार

अहमदनगर - एक मुलगी शिकली तर, दोन घरांना सावरते. हे उदाहरण सार्थ करून दाखवले आहे संगमनेरच्या सुनंदा भागवतांनी! अनाथ, उपेक्षित असलेल्या ५०० पेक्षा अधिक मुलींना शिकवून स्वतःच्या पायावर उभे करताना १ हजारांपेक्षा जास्त मुलींचे संसार भागवत यांनी उभे केले आहे. या कार्याबद्दल त्यांच्यासह त्यांच्या पतीचा सत्कार करण्यात आला.


माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. समाजासाठी वाहून घेतल्याला या जोडप्याला जीवनगौरव पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभल्याचे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पठार भागानजीक असलेल्या नांदुर खंदरमाळ येथे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - विश्वविक्रमासाठी कोपरगावची कन्या साकारतेय ११ एकरात छत्रपती शिवरायांची रांगोळी
यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते व आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, की सुनंदा भागवत यांची सामाजिक कार्यातील धडपड मागील ३ दशकांपासून मी पाहत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचीही आठवण थोरातांनी सांगितली.

हेही वाचा- हुरहुन्नरी ठका कुशाबा यांची 'एक्झिट', मात्र, शेवटपर्यंत अपूर्ण राहीली त्यांची 'ही' अपेक्षा
या कार्यक्रमाला आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, भाऊसाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन माधवराव कानवडे, पंचायत समिती सदस्य प्रियंका गडगे, जिल्हा परिषद सदस्य मीरा शेटे आदी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES