• A
  • A
  • A
विखेंच्या लोणीत पवारांची 'साखर' पेरणी, नगर दक्षिण लोकसभेचा तिढा सुटला?

अहमदनगर - शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. विखेंच्या लोणीत पवारांची साखर पेरणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर नगर दक्षिण लोकसभेचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा - देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी हातभार लावावा, शरद पवारांचा सल्ला

सुजय विखे लोकसभा लढवणारच

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही. पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवेल असे राष्ट्रवादीकडून वारंवार सांगितले जात आहे. तर दुसरीकडे वेळप्रसंगी अपक्ष लढू पण लोकसभा निवडणूक लढवणारच असा पवित्रा पद्मश्री विखे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला सोडली जाणार आणि निवडणूक कोण लढवणार हा मोठा प्रश्न या मतदार संघात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीने बरीच गणिते उलगडली जाणार असल्याचे दिसून येत आहे.पालकमंत्री राम शिंदेपुढे आव्हान
रोहित पवार यांचं नावही नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या चर्चेत आहे. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदेसमोर पवारांचे आव्हान निर्माण होऊ शकते. मात्र, पवार कुटुंबीयांनी याबाबत कोणतेही स्पष्ट मत व्यक्त केले नसले तरी रोहित पवारांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात वाढलेले संपर्क, विविध कार्यक्रमांना उपस्थिती आणि मतदारसंघात युवा संघटनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी लावलेले बॅनर हेच दर्शवतात की या मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. स्वतः रोहित पवार यांनीही पक्षाचा आदेश असेल तर तो मान्य करावा लागतो असं उत्तर देऊन या मतदारसंघातील आपली उमेदवारी पक्की असल्याच्या चर्चेला चालना दिलेली आहे.हेही वाचा - 'या' कारणामुळे पवारांना वाटते गडकरींची काळजी

पवार-विखेंच्या तिसऱ्या पिढीत मैत्री
दुसरीकडे पक्षाने तिकिट नाकारल्यास डॉ. सुजय विखेंनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले आहेत. सध्या दररोज ते मतदारसंघ पिंजून काढत असून त्यांचा जनसंपर्क सध्या गाव खेड्यापर्यंत रोजच्या रोज वाढलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवार-विखे कुटुंबातील राजकारणातील तिसरी पिढी मैत्रीच्या भूमिकेत दिसून येत असल्याने उमेदवारीचा हा तिढा सुटला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. पवार-विखे यांचे राजकीय मतभेद अनेकदा समोर आलेले असले तरी २०१४ नंतर सत्तेच्या बाहेर राहिलेल्या आघाडीतील दोन्हीकडच्या नेत्यांना आता कदाचित सत्तेविना शहाणपण आलं की काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे.


हेही वाचा - पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठीच पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात..!


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES