• A
  • A
  • A
कुरणवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळला बिबट्या

अहमदनगर - जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कुरणवाडी परिसरात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला पिंजरा लावून पकडले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.


हेही वाचा-नगरची 'साकळाई' योजना पूर्ण होऊ दे... अभिनेत्री दीपाली सय्यदचे साईबाबांना साकडे
कुरणवाडी येथील शेतकरी घमाजी शिवराम खिलारी यांच्या शेतामध्ये पहाटेच्या वेळी कांद्याच्या शेतात शेतमजुरांना बिबट्या बसलेला दिसला. त्यामुळे जवळपासचे शेतकरी भयभीत झाले होते. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी बिबट्या जखमी असल्याचे दिसून आले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्यासमोर पिंजरा ठेवला. त्यावेळी बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली. जखमी बिबट्याला डिग्रस नर्सरीत पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले असून जुन्नर येथील डॉक्टरांचे विशेष पथक उपचारासाठी येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा-पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांची १३ फेब्रुवारीला राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES