• A
  • A
  • A
कोपरगाव कारागृहात न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू

अहमदनगर - कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातील बराक क्रमांक २ मधील न्यायालयीन कोठडीत असलेला एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय रमेश श्रावणे (वय २८, शिर्डी) असे मृत आरोपीचे नाव असून त्याला अचानक त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.


याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष बाबुराव आव्हाड यांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीत म्हटले की, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज पटेल, राघु कोतकर, अनिश शेख कारागृहात कर्तव्य बजावत असताना ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठाडीत असलेला आरोपी अजय रमेश श्रावणे याला रात्री साडे दहा वाजता अचानक त्रास होऊ लागला. ही माहिती तुरुंग निरीक्षक रवींद्र देशमुख यांना तातडीने कळवण्यात आली. त्यांनी अजय यास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुगणालयात उपचारासाठी दाखल केले.

वाचा- राम मंदिरसाठी न्यायालयाच्या निर्णयाची गरज नाही - सुब्रमण्यम स्वामी
आज पुन्हा सकाळी १० वाजता इतर तपासणीसाठी घेऊन येण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दि १० रोजी दोन वाजून दहा मिनिटाच्या सुमारास आरोपी श्रावणे हा अत्यावस्थ स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यास पुन्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासणी केली असता तो मृत झाल्याचे सांगितले.
वाचा- गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामी
आरोपी श्रावणे हा शिर्डी येथे अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी होता. १ नोव्हेंबर २०१८ पासून तो शिक्षा भोगत होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी भेट दिली. या प्रकारणाचा तपास सहायक फौजदार भालेराव करत आहेत. श्रावणे याच्या मृतदेहाचा पंचनामा तहसीलदार किशोर कदम यांनी केला. मृत आरोपीचा ससून रुगणालय (पुणे) येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती तुरुंग निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.

वाचा- "आता प्रियंका गांधींचा मुलगाही प्रचारात उतरलेला पाहायला मिळेल"
शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकंच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, न्यायदंडाधिकारी, तुरुंग प्रशासनास पाठविण्यात आली आहे. सद्यस्थितीत येथील चार बराकी मध्ये ४९ न्यायालयीन कोठडी व तीन पोलीस कोठडी असे ५२ आरोपी ठेवण्यात आले आहेत. केवळ १६ कैदी ठेवण्याची क्षमता असताना येथे मात्र नेहमी ५० ते ७० पेक्षा जास्त आरोपी ठेवण्यात येतात. त्यामुळे याचा ताण पोलीस प्रशासनासह तुरुंग प्रशासनावर देखील पडतो.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES