• A
  • A
  • A
नगरची 'साकळाई' योजना पूर्ण होऊ दे... अभिनेत्री दीपाली सय्यदचे साईबाबांना साकडे

अहमदनगर - जिल्ह्यातील साकळाई पाणी योजना पूर्ण होवो, यासाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत साईबाबांना साकडे घातले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील ३६ गावांना याचा फायदा होणार आहे.


सदरील योजना पुर्णत्वास गेल्यानंतर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. मागील २० वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा लढा सुरू असून जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही मात्र ही योजना 'जैसे थे'च राहिली.

हेही वाचा -पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांची १३ फेब्रुवारीला राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद
आता मात्र मी या शेतकऱ्यांबरोबर असल्याचे दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. तसेच या संदर्भात २८ फेब्रुवारीला या मुद्द्यावरुन आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सय्यद यांनी स्पष्ट केले. साकळाई पाणी योजनेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी करणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी म्हंटले आहे.




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES