• A
  • A
  • A
पत्नीची हत्या करुन आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीसह प्रेयसीस अटक

अहमदनगर - अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीस ठार मारत तिच्या आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीस व त्याच्या प्रेयसीस अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर महिलेचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली.


हेही वाचा - अखेर ठाण्यातील विवाहितेच्या खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून पतीच्या...
प्रदीप गाडे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधास प्रदीपची पत्नी ज्योती हिचा विरोध होता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. बुधवारी काही कारणावरून पतीच्या प्रेयसीसोबत ज्योतीचा वाद झाला. प्रदीप व त्याच्या प्रेयसीने ज्योतीच्या पोटात व छातीवर मारहाण केली. या मारहाणीत ज्योती गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिच्या तोंडात विषारी औषध ओतून तिचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केला गेला होता.
हेही वाचा - यवतमाळमध्ये ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या
शवविच्छेदन केल्यानंतर ज्योती गाडे यांचा मृत्यू विषारी औषधामुळे नव्हे, तर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान मृत ज्योतीचे वडील गीताराम जयवंत शेटे (रा. शेटेवस्ती, देवळी प्रवरा, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मृत ज्योतीचा पती प्रदीप आणि त्याची प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
हेही वाचा - अखेर ठाण्यातील विवाहितेच्या खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून पतीच्या...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES