• A
  • A
  • A
पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांची १३ फेब्रुवारीला राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषद

अहमदनगर- संकटात सापडलेल्या पॉलीहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर येथे 13 फेब्रुवारीला राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व राज्य पदाधिकारी उदय नारकर यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या या कर्जमुक्ती परिषदेसाठी राज्यभरातून हजारो पॉलीहॉऊस शेडनेटधारक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.


अहमदनगर येथील सैनिक कल्याण समिती लॉन्स येथे सकाळी ११ वाजता संपन्न होत असलेल्या या परिषदेमध्ये शेडनेट पॉलीहाऊस धारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी न्यायालयीन लढाई लढण्याबाबत तयारी केली जाणार आहे. उद्योग तोट्यात गेल्याने बँका उद्योगांना कर्जात सूट देतात त्याच धर्तीवर पॉलीहाऊस शेडनेट धारकांना तोट्यात गेल्यावर कर्जात सूट मिळणे अपेक्षित आहे. न्यायालयात यासाठी दाद मागणे आवश्यक आहे. तोट्यात गेलेल्या पॉलीहाऊस शेडनेट धारकांनी या न्यायालयीन लढाईची जोरदार तयारी सुरू केली आहे. परिषदेत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्हावार याद्या बनवून अशा शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात दाद मागण्यांबाबत कार्यवाही केली जाणार आहे. संकटग्रस्त पॉलीहाऊस शेडनेट धारक शेतकऱ्यांनी यासाठी आपला सातबाराचा उतारा, बँकेचे कर्ज स्टेटमेंट सोबत घेऊन यावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठीचे अर्जही यावेळी भरून घेतले जाणार आहेत.

पॉलीहॉऊस शेटनेट धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समितीच्या पुढाकाराने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीत कर्जबाजारी शेडनेट पॉलीहाऊस धारकांच्या याद्या व माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून गोळा करण्याबाबत निर्णय झाला आहे. कृषी राज्य मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. परिषदेत या निर्णयांची माहिती देऊन आगामी कार्यवाहीचे नियोजन करण्यात येणार आहे.

पॉलीहॉऊस शेटनेटधारक शेतकऱ्यांनी या परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र पॉलीहॉऊस शेटनेटधारक शेतकरी समन्वयक समितीचे बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर, अण्णा सुंब, शिवाजी तळेकर, अनिरुध्द रेडेकर, शिवाजी नाईक, संजय तळेकर, नामदेव जाधव, विकास वाघ, भालचंद्र दौंडकर, वासुदेव चौधरी आदींनी केले आहे.

-

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES