• A
  • A
  • A
साकळाई पाणी योजनेसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको

अहमदनगर - जिल्ह्यातील काही तालुक्यात वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रुईछत्तीसी (तालुका नगर) याठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी जर या प्रशांनकडे लक्ष दिले नाही तर निवडणुकीच्या काळात त्यांनी फिरकूही देणार नसल्याचा इशार आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.नगर दक्षिणचे भाजपचे खासदार दिलीप गांधी तसेच काँग्रेस युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी साकळाई योजनेचे पाणी आणून द्यावे, यासाठी राज्यस्तरावर मंत्रालयामध्ये आवाज उठवावा. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. त्यांनी असे केले नाही तर त्यांना मतदानाच्या वेळेस गावात फिरकूही देऊ नका तसेच मतदानावर बहिष्कार घाला असे यावेळी त्यांनी सांगितले. सुजय विखे यांनी ८ दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू असे सांगितले, तर खासदार गांधी यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडविण्याचे आश्वासन दिले आहे.
साकळाई योजनेवरून या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी लोकप्रतिनिधींसह कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज शेंडे, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, शिवसेनेचे नेते घनश्याम शेलार, पुरुषोत्तम लगड, संदेश कारले आदी साकळाई उपसा जलसिंचन योजना समितीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

दीपाली सय्यद करणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत नेतृत्व

साकलाई पाणी योजना ही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या हक्काची योजना आहे. पाण्यासाठी या सरकारकडे भीक मागायची वेळ येते ही शोकांतिका आहे. या योजनेसाठी काही गरज पडल्यास मी स्वतः मदत करेल असे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दीपाली सय्यद यांनी सांगितले. दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांची २६ फेब्रुवारीला बैठकीसाठी वेळ घेतली असून बैठकीचे नेतृत्व आपण करणार असल्याचे सांगितले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES