• A
  • A
  • A
उपोषणकर्त्या कृषीकन्यांचे पुणतांब्यात जंगी स्वागत, भेट न घेणाऱ्या विखे-पाटलांवर कडाडून टीका

अहमदनगर - पुणतांबा येथे ३ शेतकरी मुलींनी पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले. अहमदनगर येथे उपचार घेऊन आज पुणतांब्यात पुन्हा आल्यानंतर या मुलींचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी निकीता जाधवने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांवर टिकेची झोड उठवली.


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणतांब्यातील निकीता, शुभांगी आणि पूनम जाधव या तीन मुलींनी अन्नत्याग आंदोलन केले होते. पाच दिवसांच्या आंदोलनानंतर या मुलींची रुग्णालयात रवानगी करण्यात आली होती. रुग्णालयात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुलींना नारळ पाणी देत उपोषण सोडवले. त्यानंतर या तिन्ही मुलींचे त्यांच्या पुणतांबा गावी जंगी स्वागत करत सन्मान करण्यात आला. उपोषणाच्या पाचही दिवसात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या तालुक्यात हे गाव असूनही भेट देण्यासाठी ते आले नाहीत. त्यामुळे निकीता जाधवने विखे पाटलांवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - उपोषणकर्त्या कन्यांवर उपचारासाठी मज्जाव करणाऱ्या वडिलांसह चौघांना न्यायालयीन कोठडी
मी केवळ पुणतांब्यात येण्यासाठी आंदोलन मागे घेतले आहे. मी हारले नसून आता माझी दुसरी लढाई सुरु होणार असल्याचे निकीताने म्हटले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उध्दव ठाकरेंनी मध्यस्थी केली आहे. त्यांची भेट घेण्यासाठी उद्या जाणार असून परवा मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे निकीताने म्हटले आहे.
हेही वाचा - ६ दिवसांनंतर कृषीकन्यांनी सोडले उपोषण, राज्यमंत्री खोतकरांच्या हस्ते घेतले नारळपाणी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES