• A
  • A
  • A
उपोषणकर्त्या कन्यांवर उपचारासाठी मज्जाव करणाऱ्या वडिलांसह चौघांना न्यायालयीन कोठडी

अहमदनगर - पुणतांबा येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकरी कन्यांची प्रकृती खालावली. तेव्हा त्यांना उपचारासाठी रात्री नगरला घेऊन जाण्यात येत होते. याला विरोध करणाऱ्या आंदोलक मुलीच्या वडिलांसह ४ जणांना राहाता पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज राहाता कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने त्यांना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा - तोडगा नाही ! राम शिंदेच्या भेटीनंतरही शेतकरी कन्यांचे अन्नत्याग सुरुच

पुणतांबा येथील अन्नत्याग आंदोल करत असलेल्या मुलींना पाचव्या दिवशी रात्री पोलिसांनी बळाचा वापर करत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी विरोध करणाऱ्यांना पोलीसांनी अटक केली होती. अटक केलेल्यांमध्ये धनंजय भास्करराव जाधव, हेमंत दिगंबर कुलकर्णी, गजेंद्र सर्जेराव जाधव, प्रताप अर्जुनराव वहाडणे (सर्वजण रा. पुणतांबा, ता. राहाता ) यांचा समावेश आहे. त्यांना आज दुपारी राहाता येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले.


हेही वाचा -
'मला पुणतांब्याला जायचंय..! उपोषणकर्त्या मुलीची रुग्णालय प्रशासनाला विनंती
न्यायालयाने याप्रकरणी चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पुणतांब्यात शेतकरी कन्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले असले, तरी एका आंदोलक मुलीचे वडील आणि इतर ग्रामस्थांना अटक करण्यात आली. यामुळे पुणतांबा ग्रामस्थामधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आज पुणतांब्यात याबाबत शिवेसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि किसान क्रांतीचे जयाजी सुर्यवंशी यांनी एक बैठक घेतली आहे.




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES