• A
  • A
  • A
गोठ्यावर विद्युत तार कोसळल्याने ९ गायींचा मृत्यू

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील कनोली गावाच्या परिसरातील गोठ्यावर मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून पडल्याने ९ गायींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नानासाहेब ठकाजी वर्पे असे गोठ्याच्या मालकाचे नाव आहे. त्यांचे या आकस्मिक संकटामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.



कनोरी गावाच्या परिसरात शेतकरी नानासाहेब वर्पे यांच्या मालकीच्या गोठा आहे. त्यांनी त्या गोठ्यात गायी बांधल्या होत्या. या गोठ्याजवळून विद्युत महावितरणाची मुख्य वाहिनी गेली आहे. या वाहिनीची तार अचानक तुटून गोठ्यावर पडली. विद्युत पुरवठा सुरू असल्याने गोठ्यात बांधलेल्या गायींना विद्युत झटका लागला. त्यात ९ गायीचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - आंदोलनकर्त्या मुलींची भेट घेण्यासाठी मंत्री खोतकर रुग्णालयात दाखल
या घटनेमुळे वर्पे यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे संतप्त गावकऱ्यांचे म्हणणे आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES