• A
  • A
  • A
पुणतांब्यातील अटकेविरोधात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन; शिवसेना खासदार सहभागी

अहमदनगर - पुणतांब्यातील आंदोलनाला आता राजकीय रंग येत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रात्री प्रशासनाकडून मुलींना बळजबरीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी अटक केली. या अटकेविरोधात गावकऱ्यांकडून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या ठिय्या आंदोलनात शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेही सहभागी झाले आहेत.


पोलिसांनी प्रताप वहाडणे, बबलु जाधव, आंदोलक मुलगी निकीता जाधवचे वडील धनंजय जाधव यांना रात्री अटक केली होती. या अटकेविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याप्रकरणी सदाशिव लोखंडे सहभागी यांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - आंदोलनकर्त्या मुलींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर
शासन दडपशाही पद्धतीने आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अटक करण्यात आलेल्या ग्रामस्थांना पोलिसांकडून आज दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES