• A
  • A
  • A
शेतकरी कन्या उपोषण: प्रशासन आंदोलन दडपत असल्याचा आंदोलनकर्त्या मुलींचा आरोप

अहमदनगर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या पुणतांबा गावातील उर्वरित २ मुलींना पोलिसांनी बळाचा वापर करत जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. आज या मुलींच्या आंदोलनाचा ६ वा दिवस आहे.


प्रशासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आज ग्रामस्थांकडून गावात बंद पाळत निषेध केला जाणार आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री आणलेल्या दोन मुलींची तब्येत सर्वसाधारण असली तरी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. सरकार आमचे आंदोलन दडपण्याच प्रयत्न करत आहेत. मात्र, आमचे उपोषण सुरू असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या शिवाय आम्ही आंदोलन संपवणार नाही, अशा आंदोलनकर्त्या मुली म्हणाल्या.

चौथ्या दिवशी उपोषणाला बसलेल्या मुलींपैकी एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवसापासून या मुलींची प्रकूती खालवण्यास सुरुवात झाली होती. शुभांगी जाधव हिला जास्त त्रास होत असल्याने गुरुवारी रात्रीच रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर पुनम आणि निकितालाही उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनीही मुलींना उपोषण सोडण्याची विनंती केली होती, तरीही या दोन्ही मुली उपोषणावर ठाम राहिल्या.

हेही वाचा - उजनी येथे दुधातून विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर
संध्याकाळी डॉक्टरांनी या मुलींची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी मुलींचे वजन घटले असून युरीनमधली किटॉनचे प्रमाणही वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे प्रशासनाने रात्री जिल्हा रुग्णालयात त्यांची रवानगी केली. दरम्यान, रुग्णालयात जाण्यास मुलींनी विरोध केला. त्यावेळी निकिताचे वडील धनंजय जाधव यांनीही विरोध केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES