• A
  • A
  • A
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

ठाणे - कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. शिवाजी वडवले असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे.


हेही वाचा - ठाण्यात शौचालयांची दैनावस्था; "टमरेल" देऊन मनसेकडून पालिका प्रसाशनाचा निषेध
मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी वडवले हे कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावरील किशोर गावानजीकच्या निसर्ग ढाब्यासमोरून चालत जात होते. त्याच सुमाराला एका भरधाव येणाऱ्या दुचाकीची शिवाजी वडवले यांना धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने शिवाजी वडवले यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच दुचाकी चालक घटनास्थळावरून दुचाकी सोडून पसार झाला. या अपघात प्रकरणी दुचाकीस्वारवर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळावरून दुचाकी जप्त करीत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; शेकडो तरुणांनी बायोडाटा पाठवला मोदींना

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES