• A
  • A
  • A
सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकची जोरदार धडक बसून १९ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ओवळी गावानजीक असलेल्या रुख्मिणी ढाब्यासमोर घडली. प्रणय उर्फ बाबा किशोर धीवर (रा. ओवळी, भिवंडी ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.


या प्रकरणी ट्रक चालक सीताराम कन्हैयालाला पटेल ( ३९ रा. जौनपुर, उत्तरप्रदेश) याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रणय हा मुळचा बीड जिल्ह्यातील काळेगाव घाट येथील रहिवाशी असून कामानिमित्त धीवर कुटुंब भिवंडी तालुक्यातील ओवळी गावात स्थाईक झाले आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रणय दुचाकीवरून ओवळी गावानजीक असलेल्या रुख्मिणी ढाब्या समोरून जात असताना मंबईच्या दिशेने सिमेंट मिक्सर ट्रक भरधाव वेगात असल्याने त्याची दुचाकीला पाठीमागून जोरात धडक बसली. या धडकेत प्रणय पडल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वाचा-गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामी
या अपघाताची खबर नारपोली पोलीस ठाण्यास मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या अपघाताची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात घेवून ट्रक चालक सीताराम कनैयालाला पटेल यास अटक करून ट्रक जप्त केला आहे.

वाचा- राम मंदिरसाठी न्यायालयाच्या निर्णयाची गरज नाही - सुब्रमण्यम स्वामी


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES