• A
  • A
  • A
भिवंडी महापालिकेच्या तरण तलावात १९ वर्षीय युवकाचा बुडून अंत

ठाणे - भिवंडी निजामपूर महापालिकेच्या तरण तलावात रविवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची दुर्घटना घडली आहे. फरमान खान (वय, १९ रा. भंडारी कंपाऊंड, भिवंडी) असे तरण तलावात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.


भिवंडी शहरातील धोबी तलाव परिसरातील टावरे क्रीडांगण लगत महानगरपालिकेच्या निधीतून तरण तलाव उभारण्यात आला. हा तरण तलाव बीओटी तत्त्वावर व्यवस्थापनसाठी खाजगी क्लबला दिला आहे. या तरण तलावत आज दुपारच्या वेळी फरमान खान मित्रांसोबत पोहण्यासाठी आला होता. तलावात उतरला असता त्याला तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा अंत झाला. दुर्दैव म्हणजे त्यावेळी तेथे जीवनरक्षक नसल्यानेच ही घटना घडली असून यास सर्वस्वी व्यवस्थापक संस्था जबाबदार असून त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

वाचा- मुंबईत ३८ कोटींचे कोकेन जप्त; चार नायजेरियन नागरिकांना अटक
मृत फरमान हा एनसीसी कॅडेट असून त्याला भारतीय सैन्य दलात जाण्याची अपार इच्छा होती. त्या संदर्भातील परीक्षाही त्याने नुकताच दिली होती. त्याचा निकाल उद्या लागणार असल्याने तो आनंदित होता. मात्र, त्या अगोदरच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सादिक बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन फरमान याचा मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे.

वाचा - भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल, सुप्रिया सुळेंचा पलटवार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES