• A
  • A
  • A
धावत्या ट्रकला भीषण आग, ट्रकसह लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक

ठाणे -  मुंबई-नाशिक महामार्गावरील संगरीला रिसॉर्टजवळ आज सायंकाळच्या सुमारास एका धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला. या घटनेत ट्रकमधील बजाज कंपनीचे लाखो रुपायांचे इलेक्ट्रॉनिक साहित्यासह ट्रक जळून खाक झाला आहे.


मुंबई-नाशिक महामार्गावरील गंगाराम पाडा येथून अर्धा किलोमीटर आंतरावर असलेल्या गोदामात या ट्रकमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य उतरावयचे होते. मात्र, चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. आगीची घटना घडताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्याकडेला उभा करून खाली उडी मारल्याने जीवितहानी टळली.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या गोदामात असलेल्या अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने ही आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत लाखोंच्या साहित्यासह ट्रक जळून खाक झाला होता.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES