• A
  • A
  • A
भिवंडी पोलीस ठाण्याच्या दंगलीतील जखमी आरोपी १२ वर्षांनी गजाआड

ठाणे - भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून ५ जुलै २००६ रोजी शहरात दंगल घडवली, असा आरोप रजा अकॅडमी संघटनेवर आहे. या दंगलीदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला दंगेखोर आता १२ वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मोईनुद्दीन गुलाम हुसेन मोमीन ( वय ३५ रा. बंगालपुरा ) असे त्याचे नाव आहे.

भिवंडीमधील अर्धवट बांधकाम झालेले पोलीस ठाणे


हेही वाचा - मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपीचा मृतदेह आढळला; खून झाला असल्याचा...
या दंगलीत दंगेखोरांनी २ पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी घेतला होता. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक करताना प्रतिरोधासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात मोईनुद्दीन जखमी झाला होता. भिवंडी शहरातील कोटरगेट - कसाईवाडा येथील सरकारी जागेवर नवीन पोलीस ठाण्याचे बांधकाम हाती घेतले असता ४०० ते ५०० जणांच्या एका गटाने पोलिसांवर जोरदार दगडफेक सुरू केली होती. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र तरीही जमाव काबूत येत नसल्याने अखेर पोलिसांनी जमावाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारातील एक गोळी मोईनुद्दीन याच्या डाव्या पायाला लागली होती. मात्र ती गोळी त्याने गुपचूपपणे डॉक्टरांकडे जाऊन काढून उपचार केले. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पायाची जखम ही बंदुकीच्या गोळीची नसून दगड लागल्याने झाल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेवून त्याला व्रण असलेल्या जखमेच्या पायाच्या तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले.
हेही वाचा - सज्जन कुमार यांच्या याचिकेवरील सुनावणी १४ जानेवारीला
जेजे रुग्णालयात त्याच्या पायाची वैद्यकीय तपासणी केली असता पायात बंदुकीची गोळी लागल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे गुन्हे अन्वेषण पोलिसांनी त्याला निजामपूर पोलिसांच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करून अटक केली. मोईनुद्दीन यास न्यायालयात हजर केले असता त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर करीत आहे.
आजही या जागेत अर्धवट बांधकाम झालेल्या स्थितीत पोलीस ठाण्याचे काम असल्याने निजामपूर पोलीस ठाण्याचे स्थलांतर जुन्या महापालिका इमारतीमध्ये करण्यात आले आहे. आता याच स्थलांतर झालेल्या ठाण्यातून पोलिसांचे कामकाज चालत आहे.
हेही वाचा - गुजरात दंगल : ४ दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES