• A
  • A
  • A
"आता प्रियंका गांधींचा मुलगाही प्रचारात उतरलेला पाहायला मिळेल"

ठाणे - रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका यांना रणागंणात उतरविल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता राहूल गांधी यांनी प्रियंकाला प्रचारात उतरविले असून त्यांनाही पराभवालाच सामोरे जावे लागेल. आता काही वर्षांनी आपल्याला प्रियंका गांधीचा मुलगाही प्रचारात उतरलेला पाहावयास मिळेल, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.


भाजपच्या ठाणे आणि पालघर विभागातील ४ लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भिवंडीतील अंजूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण मंत्री विनोद तावडे बोलत होते. पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना आणण्यासाठी प्रत्येक शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुखाने कार्यरत राहावे. विरोधकांकडून पंतप्रधान मोदींसह भाजपवर होणाऱ्या टीकेला कार्यकर्त्यांनी चोख उत्तर द्या. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचीही मतदारांना आठवण करुन द्या, असे आवाहन तावडे यांनी यावेळी केले.

हेही वाचा - शिक्षणमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले, युवा सेनेची राज्यपालांकडे तक्रार

पूर्वी हिंदी चित्रपटात व्हीलन म्हणून रॉबर्ट नावाचा व्यक्ती असे. आताच्या रॉबर्टनेही लूट चालविली आहे, अशी उपरोधिक टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली. राफेल करारासंदर्भात आरोप करणारे राहूल गांधी आणि काँग्रेस देशद्रोही आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने आयुष्मान भारत सारखी कल्याणकारी योजना राबविली. या माध्यमातून केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघात २ महिन्यांत ५ हजार लाभार्थींना फायदा झाला. अशा योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले.

हेही वाचा - शिक्षकांनाही विनाविलंब मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ, शिक्षक परिषदेला वित्तमंत्र्यांचे आश्वासन
या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, खा.राजेंद्र गावित, आमदार किसन कथोरे, संघटन मंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासह खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा - तावडेंच्या राजीनाम्यावर विद्यार्थी संघटना ठाम, राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES