• A
  • A
  • A
डोंबिवलीत बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या औषधांची विक्री; त्रिकुट गजाआड

ठाणे - बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाईचा बडगा उचलला जात असला तरी, अनेक ठिकाणी बेकायदेशीर गर्भपाताची औषधे विक्री केली जात आहेत. डोंबिवलीतही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे विकणाऱ्या त्रिकुटाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. कल्पेश कदम, आशिष गुप्ता व पंकज रावळ अशी त्या आरोपींची नावे आहेत.


हेही वाचा - मुंबईत ३८ कोटींचे कोकेन जप्त; चार नायजेरियन नागरिकांना अटक
डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केलेले तिघेही आरोपी औषध विक्रीच्या दुकानात काम करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये काही औषध विक्री दुकानामधून बेकायदेशीरपणे गर्भपातावरील औषधाची विक्री केली जात असल्याची माहिती रामनगर पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने या टोळीचा शोध सुरू केला.

पोलिसांनी सुरू केलेल्या तपासादरम्यान डोंबिवली पूर्वेतील राजकमल मेडिकल स्टोरमध्ये काम करणारा आरोपी कल्पेश कदम याच्याकडे बेकायदेशीर औषधे सापडली. या औषधांबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ही औषधे त्याच मेडिकल स्टोरमध्ये काम करणारा आशिष कांता प्रसाद गुप्ता याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

आशिष कांता प्रसाद गुप्ताकडेही पोलिसांनी या औषधाबाबत अधिकची चौकशी केली. त्यावर त्याने ही औषधे राजलक्ष्मी केमिस्टमध्ये काम करणारा पंकज रावल याच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. या संपूर्ण तपासाअंती पोलिसांनी कल्पेश, आशिष व पंकज या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, या त्रिकुटाला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .

हेही वाचा - उळे एन्काउंटर प्रकरण; काळेच्या नातेवाईंकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES