• A
  • A
  • A
आत्महत्या करू पाहणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याला न्यायालयाचा दिलासा

ठाणे - नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गात शहापूर तालुक्यातील दळखन येथील एका शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती. पण, त्याला मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पण, न्यायालयाने शेतकऱ्याला दिलासा दिला आहे. प्रशासनाने कुठल्याही शासकीय प्रक्रिया करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


लक्ष्मण गोटीराम म्हसकर या शेतकऱ्याची शहापूर तालुक्यातील दळखन गावी शेती आहे. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी त्यांच्या जमिनीचे भूसंपादन होत आहे. पण, तिच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले होते. समृद्धी महामार्गाच्या भुसंपादनाच्या प्रक्रियेतील जमिन हक्क दर्शविण्यासाठी म्हसकर यांनी महसुल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी हरकती घेतल्या होत्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या हरकतींवर तारखा चालवून प्रकरण न्यायप्रविष्ठ बनविले होते. तसेच त्यासाठी तालुका भुमिअभिलेख अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. ती चौकशी निरपेक्षपणे करण्यात आली नसल्याते शेतकऱ्याचे म्हणणे होते. त्यामुळे ती वादग्रस्त ठरली होती.
हेही वाचा - मलंगगडच्या डोंगरावर भीषण आग; मोठया प्रमाणात वनसंपदा जळून खाक

प्रशासकीय चौकशांच्या फेऱ्यात शेतकऱ्याचे हक्क डावलण्याचा प्रयत्न झाल्याने उदरनिर्वाहाचे साधन असलेली संपूर्ण जमिन जाण्याची भीती म्हसकर यांना होती. तसेच, नागळी, उडीद, खुरासणीचे पिक हातचे जाण्याचीही भीती होती. त्यामुळे म्हसकर यांनी शेतातील आंबाच्या झाडाला दोरखंडाचा गळफास बांधून ठेवत आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

हेही वाचा - ठाणे हाफ मॅरेथॉन २०१९; स्पर्धकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाला शेतकऱ्याने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात देखील आव्हान दिले होते. न्यायालयाने शेतकऱ्याची बाजू समजून घेत दळखन गावातील गट क्रमांक २० (ब) च्या भुसंपादनातील मोबदल्याबाबत स्टेटस - को आदेश जारी केले आहेत. त्यामुळे म्हसकर यांना न्यायालयाच्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES