• A
  • A
  • A
मलंगगडच्या डोंगरावर भीषण आग; मोठया प्रमाणात वनसंपदा जळून खाक

ठाणे - सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील मलंगगडच्या डोंगराला भीषण आग लागल्याने मोठया प्रमाणात वनसंपदा आगीत जळून खाक झाली आहे. शिवाय डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ निर्माण झाले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीकडे वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या डोंगरांना भीषण आग लागूनही वन विभागाने या आगीकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

मलंगगड परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिककरण झाले आहे. मात्र असे असतानाही सहयाद्रीच्या पर्वत रांगांपैकी एक असलेल्या मलंगगडच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. तसेच कुशिवलीच्या जंगलात अनेक प्राणीही आहेत. या डोंगरावरील वृक्षांवर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची घरटी असल्याने आगीने पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

वनविभागाचे आगीकडे दुर्लक्ष
मलंगगडच्या डोंगरांमध्ये वनसंपदेसह मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचा वावर आहे. त्यासाठीची पुर्वतयारी म्हणून वनविभागाने तळे देखील तयार केले आहेत. मात्र डोंगरांना वारंवार लागणाऱ्या आगी आणि त्या विझवण्यासाठी अत्याधुनिक सामग्री नसल्याने वनसंपदा नष्ट असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.
हेही वाचा - कुर्ला बस डेपोत आगीचे रौद्ररूप, ९ वाहने जळून खाक


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES