• A
  • A
  • A
ठाणे हाफ मॅरेथॉन २०१९; स्पर्धकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग

ठाणे - येथील हिरानंदानी इस्टेट येथे आज सकाळी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या हाफ मॅरेथॉन मध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ४ किलोमीटर अश्या ३ प्रकारच्या टप्प्यातील स्पर्धेचे ठेवण्यात आल्या होत्या.


शरीर सुदृढ राहण्यासाठी आणि एकोपा जपण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्य आयोजकांचे म्हणणे आहे. सिने कलाकार राहुल बोस याच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

हेही वाचा- भारतीय महिला संघाची घोषणा, मिताली राजच्या खांद्यावर संघाची धुरा
या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले होते. या स्पर्धेत तरुणांची आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.
हेही वाचा- Ind vs NZ 3rd T20: रोमांचक सामन्यात ४ धावांनी भारताचा निसटता पराभव, मालिका २-१ ने गमावली

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES