• A
  • A
  • A
वाऱ्याच्या झोताने हलणाऱ्या इमारतीच्या खांबामुळे धोका नाही, नागरिकांची प्रतिक्रिया

ठाणे - कळवा परिसरातील इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील बाह्य भागात बसवलेला शोभेचा एक खांब हलत असल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, हा खांब फायबरचा असल्याने इमारतीला काही धोका नाही. तसेच हा खांब फक्त शोभेसाठी लावण्यात आला आहे, असे इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितले आहे.


हेही वाचा - VIDEOः वाऱ्याच्या झोताने हलू लागला इमारतीचा खांब, रहिवाशांचा जीव टांगणीला
कळव्यातील मनीषा नगर भागात गेल्या १३ वर्षांपूर्वी बांधलेल्या अमृत पॅराडाइझ या २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील खांब हवेने अचानक हलू लागला होता. यामुळे परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि महापालिकेच्या आपत्ती विभागाकडे याची तक्रार केली. यानंतर अग्निशमन दल आणि आपत्ती विभागाने इमारतीच्या खालील भागातील पार्किंग क्षेत्र रिकामे केले. तसेच खांब सुरक्षेच्या दृष्टीने जाड दोरखंडाने तात्पुरता बांधून ठेवला.

हेही वाचा - राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कलाकाराचा आर्ट्स स्टुडिओ जमीनदोस्त, पालिकेची कारवाई
या घटनेनंतर संबंधित महापालिकेच्या आपत्ती विभागाने इमारतीच्या व्यवस्थापकांना हा खांब काढण्याच्या सुचना केल्या. दुसरीकडे या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी या खांबामुळे इमारतीला काहीही धोका नसून हा शोभेसाठी लावण्यात आहे. या खांबामुळे इमारतीला आणि रहिवाशांना काहीही भीती नाही, असे सांगितले. मात्र, असे असले तरी खांबामुळे कोणताही अपघात किंवा धोका निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही संयुक्तरित्या यावर तोडगा काढून हा खांब त्वरित काढू असेही सांगण्यात आले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES