• A
  • A
  • A
अखेर ठाण्यातील विवाहितेच्या खुनाचा उलगडा; अनैतिक संबंधातून पतीच्या मित्रानेच केली हत्या

ठाणे - २१ वर्षीय विवाहितेच्या रहस्यमय खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. विवाहितेचा खून पतीच्या मित्रानेच केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या ५ दिवसात या प्रकरणाचा छडा लावला.


या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे त्या विवाहितेने २५ दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता. या दरम्यानच आरोपी नराधमाने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. मात्र, तिने नकार देताच, तिच्या मानेत चाकू भोसकून तिची हत्या केली आणि आरोपी फरार झाला होता. विकास चौरसिया असे आरोपीचे नाव आहे. सपना राजकुमार गौतम असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या खुनाच्या गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे.

हेही वाचा- बड्या नेत्याच्या मुलीची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यास अटक
मृत सपना व पती राजकुमार हे मूळचे उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून ते भादवड परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पती राजकुमार हा गेल्या २ वर्षांपासून भिवंडीत एका यंत्रमाग कारखान्यात काम करत होता. दरम्यान, त्याची ओळख आरोपी विकास सोबत झाली होती. दोघे एकत्रच कामाला असल्याने आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याने आरोपी विकास राजकुमारच्या घरी जायचा. त्याच दरम्यान आरोपी विकास व राजकुमारची पत्नी मृत सपना या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. खळबळजनक बाब म्हणजे ती गरोदर असतानाही त्यांच्यात शारीरिक संबंध होते. प्रसूती झाल्यानंतर ४ फेब्रुवारीला पती राजकुमार कामावर गेला असताना सपना हिने विकासला घरी बोलावले होते. त्यावेळी विकासने तिच्याकडे शारीरिक संबंधाचा तगादा लावला असता सपनाने नकार दिला. त्यामुळे विकासने घरातील चाकू तिच्या मानेवर खुपसून तिची हत्या केली. तसेच तेथील रक्ताचे डाग पुसून तो फरार झाला होता.

हेही वाचा- सोलापुरात पोलिसांची दरोडेखोरांशी धुमश्चक्री; ३ पोलीस जखमी, १ दरोडेखोर ठार
या प्रकरणाचा तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आरोपी विकासला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES